गुंतवणुक करण्याआधी शेअर मार्केट, शेअर बाजार काय आहे वाचा|All About Stock Market 1
Stock market: स्टॉक / शेअर मार्केट काय आहे?
शेअर मार्केट ही एक अशी जागा आहे. जिथे आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो. जसं आपण एखादी भाजी खरेदी किंवा विक्री करतो त्याचप्रमाणे आपण शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. पण यामध्ये फरक एवढाच असतो की आपण भाजी खरेदी करण्यासाठी आपल्याला मार्केट मध्ये जावं लागतं. पण येथे शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नसते. आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून ते खरेदी विक्री करू शकता. त्यासाठी आपल्याला एका डिमॅट अकाउंट ची गरज असते.
शेअर खरेदी किंवा विक्री का करतात?
समजा तुम्हाला एखादी कंपनी सुरू करायची आहे व त्यासाठी भांडवल लागणार आहेत. तर तुम्ही काय कराल तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे पैसे वापरता समजा ते पैसे कमी पडले तर तुम्ही तुमच्या मित्राकडे किंवा इतर कोणाकडे मागता त्याबदल्यात त्याला आपण त्याची हिस्सेदारी देतो तसेच शेअर मार्केट सुद्धा चालत असते. फक्त यामध्ये फरक एवढाच असतो की तुम्ही मित्राकडे पैसे मागण्या ऐवजी खूप साऱ्या लोकांकडून पैसे घेता. त्याबदल्यात त्यांना चांची हिस्सेदारी द्यावी लागते.
एखादी कंपनी चालवण्यासाठी त्या कंपनीला सुरवातीला भांडवलाची गरज असते. जेव्हा एखादा उद्योजक नवीन कंपनी सुरू करत आहे. तर तो पहिल्यांदा तो त्याचे स्वतःची गुंतवणूक करतो म्हणजे तो त्याचे स्वतःचे पैसे वापरून व्यवसाय सुरू करतो. हीच त्या कंपनी साठी पहिली गुंतवणुक असते.
दुसरा टप्पा यामध्ये कंपनी चे मालक हे एखाद्या बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्था यांकडून व्याजाने पैसे घेतात. या प्रकारच्या गुंतवणुकीत कंपनीचे मालक हे बँकेला किंवा संस्थेचा लोन घेतलेल्या रकमेवर व्याज देत असतात.
तीसरा टप्पा या ठिकाणी कंपनीचे मालक हे कंपनी चालवण्यासाठी पब्लिक म्हणजेच सामान्य लोकांकडून पैसे घेतात त्याबदल्यात लोकांना त्यांच्या गुंतवणुकी प्रमाणे कंपनीमध्ये भागीदारी दिली जाते. या प्रकारच्या गुंतवणुकीत कंपनीचे मालक कोणतेही व्याज देत नाहीत. पण जर कंपनीला फायदा झाल्यास कंपनीला झालेला फायदा हा आपल्या गुंतवणूकदारांना वाटण्यात येतो. किंवा जर कंपनीच्या शेअर मध्ये वाढ झाल्यास ती वाढ ही गुंतवणुक करणाऱ्याचा नफा असतो.
समजा मी माझे 100 रुपये आणि तुमचे 100 रुपये घेऊन कंपनी सुरू केली तर त्या कंपनी वर 50% तुमचा मालकी हक्क असेल.
शेअर मार्केट/बाजार कसं काम करत?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर मार्केट नक्की चालत कसं तर यामध्ये दोन प्रकारचे मार्केट असतात. ज्याला प्रायमरी मार्केट बोलले जाते.
प्रायमरी मार्केट
तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल या कंपनी चा IPO आयपओ आला किंवा येणार आहे. जेव्हा पण एखादी कंपनी पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट होते. तेव्हा त्याला प्रायमरी मार्केट बोलले जाते.
सेकंडरी मार्केट
जेव्हा ती कंपनी एखाद्या एक्सचेंज वर लिस्ट झालेली असते. त्याचा ती कंपनी सेकंडरी मार्केट मध्ये ट्रेड होत आहे असं आपण म्हणू शकतो.
स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
स्टॉक एक्सचेंज ही एक आशी जागा आहे. जिथे कंपन्या लिस्ट केल्या जातात. नंतर मग त्या तिथून ट्रेड केल्या जातात. भारतामध्ये प्रामुख्याने दोन एक्सचेंज आहेत. एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरी BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज.
IPO म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या कंपनीला पब्लिक कंपनी बनायचं असतं तेव्हा त्या कंपनीचा आयपिओ आणला जातो. त्यानंतर ती कंपनी स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होते. म्हणजे आपण त्या कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो.
स्टॉक मार्केट गुंतवणुक केल्याचे फायदे किंवा नुकसान कोणते.
जर तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी केला आणि त्या कंपनीचा शेअर चा भाव वाढला तर तो तुमचा फायदा असतो. व त्याच प्रमाणे जर कंपनीच्या शेअर चा भाव कमी झाला तर तो तुमचा तोटा असतो.
उदा. जर मी एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी केलाय त्याचा भाव 100 रुपये आहे. आणि मी घेतल्यानंतर त्याचा भाव 105 रुपये झाला तर त्यामध्ये 5 रुपये मला फायदा झाला. आणि समजा मी शेअर घेतल्यानंतर त्याच कंपनीचा भाव हा 95 रुपये झाला तर 5 रुपये माझा तोटा असेल.
आपण गुंतवणूक केलेल्या कंपनीला जर फायदा झाला आणि त्यांनी डिव्हिडेंड जाहीर केले तर ते डिव्हिडेंड गुंतवणूक दारास त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते.
त्याच प्रमाने शेअर स्प्लिट, बोनस शेअर यांचा सुद्धा शेअर खरेदी करण्यासाठी फायदा होत असतो.
गुंतवणुक ही इतर प्रकारच्या गुंतवणुकी तुलनेत कमी असते. अगदी इथे काही पैशांपासून कंपनीचे शेअर उपलब्ध असतात.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून तुम्ही खूप पैसे बनवु शकता इतर प्रकारच्या
शेअर्स ची कशी ठरवली जाते?
जेव्हा कंपनीचा IPO येतो तेव्हा त्या शेअर्स ची किंमत ही मरचंड बँकर एक रेंज मध्ये ठेवतात त्यानंतर त्या शेअर साठी बोली लावली जाते. ज्या रेट मध्ये तो शेअर लिस्ट होईल ती त्या शेअर ची पहिली किंमत असते. त्यानंतर मार्केट मध्ये मागणी आणि पुरवठा म्हणजेच डिमांड सप्लाय प्रमाणे त्या शेअर्स ची किंमत कमी जास्त होत असते.
समजा ABC कंपनीचा IPO किंमत हि 10 ते 15 रुपये आहे. आणि त्यावर बोली ही 20 रुपये लागली तर त्या कंपनीच्या शेअर ची पहिली किंमत ही 20 रुपये आहे. आणि त्यानंतर जर त्या शेअर ला 25 रुपयाची मागणी आहे. विकणारा तयार असेल तर मग तिथून 25 रुपये असच जर कमी किंमतीमध्ये विकणारा असेल तर मग त्याची किंमत ही कमी होत जाते.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे सट्टा किंवा जुगार आहे का?
बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे. की स्टॉक मार्केट हा एक सट्टा किंवा जुगार आहे. पण असं काहीही नाही स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे हे कोणताही जुगार खेळणे किंवा सट्टा खेळणे असं नाही. स्टॉक मार्केट हे एक बाकी व्यवसायाप्रमाणे व्यवसाय आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला पुरेसा अभ्यास करणे आवश्यक आहे. जर आपण या व्यवसायाची पुरेशी माहिती न घेता यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला नुकसान होऊ शकतो.
बरेच लोक कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता यामध्ये गुंतवणूक करत असतात त्यामुळे त्यांना यात नुकसान सहन करावे लागते.
गुंतवणुक कशा प्रकारे करावी?
स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट ट्रेडिंग आणि बँक अकाउंट ची गरज असते. यांपैकी आपल्याकडे बँक अकाउंट असते. डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हे वेगवेगळे असले तरी ते बरेच ब्राकर एकच ठीकणी उपलब्ध करून देतात. जसं की Zerodha ,Upstocks , Angle One, ICICI Securities इत्यादी त्यानंतर तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता.
स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे नुकसान दायक आहे का?
स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे त्या लोकांसाठी नुकसानदायक होऊ शकतो जी लोक कोणताही अभ्यास न करता यामध्ये आपली गुंतवणुक करत असतात. जर तुम्ही याचा व्यवस्थीत अभ्यास केला तर तुम्ही यामधून खुप पैसे कमावू शकता.
स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक साठी कोणत्या प्रकारचा अभ्यास केला जातो?
यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दोन प्रकारे आपण अभ्यास करू शकता. एक टेक्निकल आणि दुसरं म्हणजे फंडामेंटल टेक्निकल मध्ये तूम्ही एखाद्या कंपनीचा चार्ट 📈📉 चा अभ्यास करून गुंतवणूक करता याला ट्रेडिंग सुद्धा बोलले जाते. आणी दुसर फंडामेंटल मध्ये तूम्ही कंपनीचे मालक कोण आहेत कंपनी काय करते बॅलन्स शीट आणि प्रॉफिट आणि लॉस यांचा अभ्यास करता.
शेअर मार्केट मध्ये कंपन्या लिस्ट का करतात?
कंपनी एखाद्या नवीन प्रोजेक्ट वर काम करत आहे आणि त्यासाठी लागणारं भांडवल हे जास्त आहे. त्यामुळे कंपनी हा पर्याय निवडू शकते.
तसेच नवीन ब्रॅण्डिंग
कंपनीचे जुने लोन क्लिअर करण्यासाठी किंवा अशा इतर प्रकारच्या कारणासाठी कंपन्या स्वतःला लिस्ट करतात.
टीप: स्टॉक मार्केट ही एक रिस्क असलेली गुंतवणुक आहे. त्यामुळे या प्रकारच्या गुंतवणुकीत व्यवस्थीत अभ्यास केल्याशिवाय गुंतवणुक करू नये. तुम्हाला जर का गुंतवणूक करायची आहे तर सुरुवातीला छोट्या रकमेपासून सुरू करा.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.