योजना/माहिती

Aadhaar Update | घर बसल्या आधार कार्ड अपडेट करा 1

आधार कार्ड: हा एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे. या कार्ड चा वापर बऱ्याच शासकीय कामासाठी केला जातो. त्यामुळे आधार कार्ड वरील महिती ही अचूक असली पाहिजे. पण आधार बऱ्याच ठिकाणी नाव चुकीचं किंवा पत्ता चुकीचा आहे. या अशा बऱ्याच चुका आता आपण घरी बसल्या बसल्या बदलू शकता.

आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, आपले फिंगरप्रिंट आणि आयरस स्कॅन आणि इतर काही माहिती जतन केलेली असते. यांपैकी आपला पत्ता, किंवा इतर माहिती अपडेट करण्याविषयी माहिती घेणार आहोत.

Table of Contents

आधार कार्ड अपडेट कसा करावा:

आधार कार्ड वरील पत्ता बदल करणे:

आधार कार्ड वरील पत्ता बदल करण्यासाठी सर्वात आधि आधार कार्ड च्या वेबसाईट ला भेट द्या.

आधार वेबसाईट: https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident

या लिंक वर क्लिक केल्यानंतर आता पुढे आपला मोबाईल नंबर इथे टाका त्यानंतर कॅपचा कोड टाका. आणि Login With OTP या पर्यायावर क्लिक करा.

आता Update Aadhaar Address या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आता अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करा. आता अपडेट आधार करण्यासाठी पूर्ण प्रोसिजर दिलेली असेल. त्याच्याखाली Update Aadhaar हा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.

आता ऍड्रेस हा पर्याय निवडा. आणि प्रोसिड टू अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुम्हाला जुना पत्ता दिसेल. त्याच्याच खाली नवीन पत्ता भरण्यासाठी पर्याय मिळेल. पत्ता भरून झाल्याच्या नंतर पत्त्याचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट अपलोड करा.

त्यानंतर नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा. आता तुम्ही माहिती भरलेली येथे दिसेल. ती माहिती एकदा बघून घ्या. माहिती भरून झाल्याच्या नंतर त्याचे पेमेंट करण्यासाठी पर्याय मिळेल. येथे तुम्हाला पन्नास रुपयांचे पेमेंट करावे लागते.

पन्नास रुपयांचे भूकतान झाल्याच्या नंतर आपल्याला एक पावती मिळते ती पावती आपल्याकडे व्यवस्थित संभाळून ठेवा या पावतीने तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करू शकता.

आधार कार्डवर आपले नाव जन्मतारीख आणि जेंडर ही माहिती कशा प्रकारे बदलावी.

आधार कार्ड वर आपले नाव जन्म तारीख आणि जेंडर बदलण्यासाठी सर्वात आधी आपण आधारच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट ची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.

https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident

खालील लिंक उघडल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड द्वारे लॉगिन करण्यासाठी पर्याय मिळेल लॉगिन करण्यासाठी खालील कॅपच्या कोड आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.

लॉगिन झाल्याच्या नंतर अपडेट आधार ऍड्रेस हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अपडेट आधार ऑनलाईन हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे नाव जन्मतारीख आणि जेंडर हे बदलण्यासाठी पर्याय मिळेल.

या पर्यायांपैकी ज्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तो पर्याय निवडा समजा मला माझ्या नावामध्ये बदल करायचा असेल तर मी नेम हा पर्याय निवडेल.

आता येथे आवश्यक ती माहिती भरल्यानंतर सबमिट करा.

आधार केवायसी कशाप्रकारे करावी

बऱ्याच लोकांनी आधार कार्ड हे खूप आधी काढलेलं होतं. हे आधार कार्ड सध्या केवायसी इनकंप्लीट असल्यामुळे इन्व्हॅलिड होतं त्यामुळे त्याची केवायसी करणे गरजेचे असते.

केवायसी करण्यासाठी सर्वात आधी आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या वेबसाईट लिंक वरील लेखात दिलेले आहे.

वेबसाईट उघडल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट हा पर्याय मिळेल. आता इथे काही माहिती दिलेली असेल. आता इथे पुढे नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची माहिती मिळेल ही माहिती अचूक असल्यास व्हरिफाय या बटन वर क्लिक करा.

आता येते तुम्हाला कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करावा लागतो. अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटची तारीख सरकारने १४/१२/२०२४ दिलेली आहे. या तारखेपर्यंत आधार केवायसी करणे मोफत असेल. या तारखेनंतर केवायसी केल्याने शुल्क आकारला जाऊ शकतो.

आधार कार्ड डाऊनलोड कशाप्रकारे करावा.

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरील आधार कार्ड च्या वेबसाईट ला भेट द्या. आता तुमच्या आधार कार्ड लॉगिन करा.

लॉगिन झाल्यानंतर डाऊनलोड आधार हा पर्याय मिळेल. आता तुम्हाला मास्क आधार कार्ड हवा असेल तर त्यावर क्लिक करा. मास आधार कार्ड म्हणजे त्याचे काही अंक हाईड केलेले असतात. आपल्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी मास्क आधार कार्डचा वापर करतात.

त्यानंतर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या आधार कार्ड डाउनलोड होईल. आधार कार्ड चा पासवर्ड आपले पहिले नावाचे चार अक्षर आणि सोबत जन्माचे वर्ष असा असेल.

पीव्हीसी आधार कार्ड कशाप्रकारे ऑर्डर करावा.

पीव्हीसी आधार कार्ड डाऊनलोड करण्याची पद्धत सुद्धा सेम आहे. त्यासाठी आधारच्या वेबसाईटला भेट द्या. आता ऑर्डर पीव्हीसी आधार कार्ड पर्यायावर क्लिक करा.

आता नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला पन्नास रुपयांचे शुल्क भरावे लागते त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमच्या घरी मिळेल.

आधार बँक सीडिंग स्टेटस कुठे चेक करता येईल

आधार बँक सीडींग स्टेटस बघण्यासाठी वरील आधार कार्ड च्या वेबसाईट ला जा. त्यानंतर तेथे लॉग इन करा.

आता आधार बँक सीडिंग स्टेटस या पर्यायवर क्लिक करा.

आता येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक येथे दिसेल.

आधार वर्चुअल आयडी कसे मिळवाल

आधार कार्ड ची वरती लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करा त्यानंतर लॉगिन करा. आता जनरेट वर्च्युअल आयडी या पर्यायावर क्लिक करा. नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्चुअल आयडी मिळेल.

आधार कार्ड लॉक कशाप्रकारे करता येईल

आता बघितलं तर सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो बऱ्याच ठिकाणी आपण आधार कार्ड देतो पण काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात हा गैरफायदा टाळण्यासाठी आपण आपल्या आधार कार्ड ला लॉक करू शकतो जेणेकरून आपली माहिती इतर कोणत्याही गैरवापर साठी होणार नाही.

आधार कार्ड लॉक करण्यासाठी वरील आधार कार्ड ची वेबसाईट ला जा. आणि त लॉगिन करा लॉगिन झाल्यानंतर लॉक अनलॉक बायोमेट्रिक हा पर्याय मिळेल.

येथे आल्यानंतर तुम्ही आधार कार्ड ला लॉक करू शकता.

आधार अपडेट हिस्टरी

आधार कार्ड चे ऑप्शन वेबसाईटवर वरील लेखात दिलेले आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड द्वारे लॉगिन करावे लागेल. लॉगिन झाल्यानंतर आपण आपला आधार कार्ड चे अपडेट हिस्टरी बघू शकता.

आधार कार्ड विषयी काही महत्त्वाचे प्रश्न

आधार कार्ड ऑनलाइन कशाप्रकारे बघता येईल?

आधार कार्ड ऑनलाइन बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक उघडल्यानंतर आपल्या लॉगिन करण्याचा पर्याय मिळेल. लॉगिन केल्यानंतर आपल्याला डाऊनलोड पर्याय मिळेल इथून आपण आधार कार्ड बघू शकतो.

आधार कार्ड वेबसाईट लिंक: https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident

मी माझे आधार कार्ड ऑनलाईन पाहु शकतो का?

हो, तूम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन पाहु शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड च्या वेबसाईट ला भेट द्यावे लागेल.

नवीन आधार कार्ड कसे बनवावे?

नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तूम्ही तुमच्या जवळच्या आधार कार्ड सेंटर ला भेट देऊ शकता. आधार कार्ड सेंटर मध्ये ऑनलाईन पद्धतीने ओप्पॉइंमेंड घेऊन सुद्धा जाता येते.

मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी कसा अर्ज करावा?

मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार सेंटर ला भेट द्या. त्यानंतर पुढे आपल्या मुलाची आवश्यक माहिती भरा. आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर आपली सोबत माहिती द्यावी. लागते.

मला माझा आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करता येईल का?

होय, तूम्ही तुमचा आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी वरील लेख संपूर्ण वाचा.

आधार कार्ड चा वापार करुन पैसे काढता येतो का?

भारतामध्ये आधार कार्ड वरून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *